वेर्ले येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ
सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेर्लेसह शिरशिंगे, ओवाळिये, कलंबिस्तकला या गावातील सुमारे तीनशेहून जास्त रुग्णांनी लाभ घेतला. अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक भवन वेर्ले येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला. यासाठी केसरी फार्माचे संचालक व उद्योजक राजेंद्र उर्फ राजू केसरकर यानी लागणारी सर्व औषधे प्रायोजित केलेली होती. या शिबीरात फिजीशियन डॉक्टर अभिजीत चितारी, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नेहा सावंत, मुञरोग तज्ज्ञ डॉ. सागर कोल्हे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदिप सावंत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखील अवधूत, एम.एस सर्जन डॉक्टर अनिकेत वजराटकर, दंतरोग तज्ज्ञ विनय सुर्यवंशी, होमिओपॅथिक डॉ. संजीव लिंगवत यानी रुग्णांची तपासणी केली. ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अशानां आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार देण्यात येणार आहेत. शिबीरात आयुष्यमान भारत नोंदणीचीही व्यवस्था केल्याने अनेकानी हा लाभ घेण्यासाठी नोंद केली.
konkansamwad 
