कुडाळ येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरचा वर्धापन दिन उद्या

कुडाळ
श्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळचा १५ वा कलशारोहण वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सकाळी ८.०० - नवचंडी पाठवाचन व धार्मिक विधी, सकाळी १०.०० - श्री. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.०० - आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० - महाप्रसाद, सायं. ७.३० - भजन (योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पावशी), रात्री ठीक ९.०० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग भक्त पुंडलीक सादर होणार आहे. तेव्हा सर्व भक्तगणांनी व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ यांनी केले आहे.