रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्षपदी रो.योगेश नाईक तर सेक्रेटरीपदी रो.ॲड.प्रथमेश नाईक यांची निवड.

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्षपदी रो.योगेश नाईक तर सेक्रेटरीपदी रो.ॲड.प्रथमेश नाईक यांची निवड.

वेंगुर्ला.

   रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनची सन २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी नाईक ॲग्रो एजन्सी चे प्रोप्रायटर, रो.योगेश नाईक यांची निवड केली आहे. सचिवपदी ॲड. रो.प्रथमेश नाईक, उपाध्यक्षपदी रो.मृणाल परब तर खजिनदार पदी रो.मुकूल सातार्डेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
  रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनची बोर्ड ऑफ डायरेक्टरची सभा  व जाॅईंट असेंब्ली मांडवी स्टे होम येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार तसेच संपूर्ण कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये वरील चार पदांसोबत डायरेक्टर बोर्ड क्लब सर्व्हिस रो. पंकज शिरसाट, व्होकेशनल सर्व्हिस रो.राजेश घाटवळ, कम्युनिटी सर्व्हिस रो. ज्ञानदेव (दादा) साळगावकर, युथ सर्व्हिस रो.आशुतोष मसुरकर, इंटरनॅशनल सर्व्हिस रो. गणेश अंधारी,  स्पोर्टस् डायरेक्टर  रो.दिपक ठाकूर,सार्जंट ॲटआर्मस रो.अनमोल गिरप व टी.आर.एफ.चेअरमन रो.सचिन वालावलकर, पोलिओ प्लस चेअरमन रो.नागेश (पिंटू) गावडे,हायजीन अँण्ड सॅनिटायझेशन चेअरमन रो.संजय पुनाळेकर, लिटरसी चेअरमन रो.वसंतराव पाटोळे, पब्लिक इमेज चेअरमन रो.दिलीप (राजन) गिरप, सर्व्हिस प्रोजेक्ट चेअरमन रो.आनंद बोवलेकर, टीच अँण्ड विन चेअरमन रो.आनंद बांदेकर, एम.एच.एम.चेअरमन डॉ. रो.राजेश्वर उबाळे, एनव्हायरमेंट चेअरमन रो.श्वेता हुले,मेंबरशिप चेअरमन रो.सुनिल रेडकर, एडिटर रो.सुरेंद्र चव्हाण व रो.सदाशिव भेंडवडे या सर्व पदांचे सदस्य निवडण्यात आले. पदग्रहण सोहळा रविवार दि. ३० जून २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ६.०० वाजता, स्वामिनी मंगल कार्यालय,वेंगुर्ले येथे प्रमुख पाहुणे व पद प्रदानाधिकारी आय.पी.डी.जी. रो.व्यंकटेश (बबन) देशपांडे, असिस्टंट गव्हर्नर रो.महादेव पाटकर, असिस्टंट गव्हर्नर डॉ.रो. विद्याधर तायशेटे व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.राजेश घाटवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार  आहे.
   या रोटरी क्लब आँफ मिडटाऊन वेंगुर्ला च्या पदग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब व  वेंगुर्ला रोटरी परिवारातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब मिडटाऊन वेंगुर्ला चे अध्यक्ष रो.शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिव रो.योगेश नाईक व खजिनदार रो.पंकज शिरसाट यांनी केले आहे.