अहमदनगर जि.प.टिमने दिली परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट. विविध स्वच्छ्ता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक.
वेंगुर्ला.
जिल्हा परिषद अहमदनगरच्या समितीने परुळे बाजार
ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जि.प.अहमदनगरच्या
अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची टिम नूकतीच परुळे
येथे ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.पंचायत समिती नेवासा सहा गटविकास अधिकारी श्री. पाटेकर, तालुका आरोग्यअधिकारी डॉ.शेटये. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोपरगाव शेख विस्तार अधिकारी जि.प.अ.नगर श्री.सानपूने, श्री.डोके, श्री.पाखर तसेच जिल्हा व्यवस्थापक आर.जी.फ.ए.विजय गायकवाड यांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आदी उपस्थित होते.समितीचे स्वागत उपसरपंच संजय दुधवडकर यांनी केले. यावेळी ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी माहीती दिली.
यावेळी समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनीटप्रक्रिया युनीट प्लॅस्टिक कचरा संकलन युनीट,प्रक्रिया
संकलन युनीट, अंगणवाडी, शाळा व्यायामशाळा. यांजबरोबर इतर उपक्रमांची माहीती घेतली व विविध उपक्रमांचे कौतुक केले.