काही झाले तरी माझाच मताधिक्याने विजय होणार : ठाकरे शिवसेना उमेदवार विनायक राऊत.

काही झाले तरी माझाच मताधिक्याने विजय होणार : ठाकरे शिवसेना उमेदवार विनायक राऊत.

सावंतवाडी.

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या कार्यालयात भेट दिली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.महाविकास आघाडीच्या रूपाने आमचा सुखाचा संसार चालला आहे.त्यामुळे काही झाले तरी माझाच मताधिक्याने विजय होणार आहे असे राऊत यांनी सांगितले.तसेच मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली एकत्र आले तरी त्यांचा पराभव हा निश्चित आहे, असा दावा माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांनी केला.
   यावेळी ॲड.दिलीप नार्वेकर,अण्णा केसरकर, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, शहराध्यक्षा सायली दुभाषी, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर,रूची राऊत,रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, समीर वंजारी,देवेंद्र टेमकर, बाळा गावडे, शब्बीर मणियार, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, बाळा गावडे, शैलेश गवंडळकर, राजा वाडकर, सतीश नार्वेकर, उमेश कोरगावकर, सतीश नाईक,श्रुतिका दळवी,हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, श्रीकांत कोरगावकर, जहूर खान, नईम मेमन, विवेक गवस, इफ्तिकार राजगुरू,संजय भाईप, तौफिक आगा, हंजला नाईक, कृपेश राठोड,संजय लाड आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.