कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. या ठिकाणी रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम जलद गतीने करण्यात यावे तसेच सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृतभारत योजनेत करण्यात यावा, स्थानकाचे नामकरण तात्काळ करण्यात यावे तसेच अन्य गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्या घेऊन प्रवासी रेल्वे संघटनेच्या माध्यमातून २६ जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.