परुळेबाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्काराने सन्मानित.

वेंगुर्ला.
मुंबई येथे १ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत परुळेबाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक कृषीसंशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्राम स्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळे बाजार ग्रामपंचायतीला जाहीर झाला होता.
१ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कृषिमंत्री धनंजय मुंडे, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १ जुलै २०२४ कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक प्रतिष्ठान तर्फे शेती बागायती प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते परुळे बाजार ग्रामपंचायत ला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामसेवक शरद शिंदे, उपसरपंच राजू दुधवडकर, माजी सभापती निलेश सामंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रसाद पाटकर उपस्थित होते. प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ति यांना सन्मानित करण्यात येते.यावर्षीचा ग्राम स्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजार ला प्रधान करण्यात आला आहे.