महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वेंगुर्ल्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वेंगुर्ल्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

 

वेंगुर्ला

 

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला चे त्रैवार्षिक अधिवेशन साई मंगल डिलक्स हॉल वेंगुर्ला येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम नाईक  होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, गट शिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा शिक्षक नेत्या श्रीम.सुरेखा कदम, महिला आघाडी अध्यक्षा श्रीम.निकीता ठाकूर व सचिव श्रीम.वैभवी कसालकर राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे, सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, शंकर वजराटकर, कोकण विभाग सचिव संतोष परब, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, पतपेढी उपाध्यक्ष श्रीम. ऋतुजा जंगले, वेंगुर्ला तालुका संचालक सिताराम लांबर, जिल्हा सल्लागार त्रिंबक आजगावकर सर्व तालुका शाखांचे तालुकाध्यक्ष व सचिव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहते, शाळा टिकल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे ही शिक्षक समितीची नेहमीच भूमिका असते,असे कार्यक्रमाचे उद्घाटक उदय शिंदे यांनी सांगितले. अस्तित्व संपत आलेल्या काही संघटना नवीन शिक्षकांना भीती घालून वेंगुर्ला अधिवेशनाला न जाण्याचे आवाहन करतात, यावरून त्यांची मनोवृत्ती दिसून येते, शिक्षक समितीची भिती घेऊन आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. विविध संस्थांचा पुरस्कार प्राप्त शिक्षक समिती सभासदांचा सत्कार, वेंगुर्ला शाखेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा टॉप टेन गुणवंत विद्यार्थी, जिल्हा शाखेमार्फत घेण्यात आलेल्या सराव परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थी, इस्रो सफरीसाठी गेलेले वेंगुर्ल्यातील विद्यार्थी, नवनियुक्त शिक्षण सेवक यांना ओळखपत्र वितरण, सन 2025 ते 2028 करिता नवीन कार्यकारिणी जाहीर करणे, भाग्यवंत शिक्षक सभासदांसाठी लकी ड्रॉ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावेळी सन 2025 - 2028 याकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून प्रसाद जाधव, तालुका सरचिटणीस म्हणून रामा पोळजी, शिक्षक नेते म्हणून सिताराम नाईक, कार्याध्यक्ष म्हणून किरण मुडशी, उपाध्यक्ष म्हणून समीर राऊळ, गणेश आजबे, समीर तेंडोलकर, कोषाध्यक्ष विनोद मेतर, सहसचिव सुधर्म गिरप, अंतर्गत हिशोब तपासनीस रामचंद्र मळगावकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन ठाकरे, विभागीय अध्यक्ष विकास आडे, सुनील राठोड, प्रकाश भोई, विभागीय उपाध्यक्ष सुंदर म्हापणकर , सचिन नवले, मारुती गुडुळकर, प्रवक्ता दत्तात्रय म्हैसकर, रवि राठोड, तंत्रस्नेही म्हणून विजय मस्के, गणेशसिंह चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष श्रीम. ऋतिका राऊळ, सचिव श्रीम. सरोज जानकर, उपाध्यक्ष म्हणून श्रीम.अर्चना मक्राणे यांची निवड जाहीर करण्यात आली.वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शिक्षक समिती पाईक या अधिवेशनास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद जाधव, सूत्रसंचालन मारुती गुडुळकर, श्रीम.समृद्धी पेडणेकर तर आभार प्रदर्शन सिताराम लांबर यांनी केले.