मालवण येथे २० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

मालवण.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅ.नाथ पै सेवांगण यांच्यावतीन बाबासाहेब सर्वांचे या कार्यक्रमाअंतर्गत २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय गटासाठी (पाचवी ते दहावी) ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग’ तर खुल्या गटासाठी ‘माझ्या मताची किंमत काय’ हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेसाठी ५ ते ७ मिनीटे एवढा अवधी देण्यात आला आहे. शालेय गटातील विजेत्यांसाठी अनुक्रमे रू.१५००, १०००, ७०० अशी परितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत.नावनोंदणीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.