सिंधुदुर्गातील हॉटेल व्यवसायिकांना पालकमंत्र्यांचा दिलासा.
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असताना व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला गॅस कंपन्यांचे समन्वयक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गॅसच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. ही गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी कंपन्यांना पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हॉटेल आणि व्यापारी संघटनांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले की, सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाशी उत्तम समन्वय ठेवण्यासाठी आपले प्रतिनिधी नियुक्त करावेत. नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
konkansamwad 
