सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचे उद्घाटन

सावंतवाडी

      पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आकाशकंदील महोत्सवाचे बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा चित्रशैलीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक कलेसोबतच पारंपरिक लोककला आणि चित्रशैलीची ओळख व्हावी, या उद्देशाने नगराध्यक्ष श्रध्दाराजे भोंसले यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्या स्वतः गंजिफा चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत या क्षेत्रातील अनुभवी कलाकारही प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत. आकाशकंदील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सौ. भोंसले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. नवीन कला आत्मसात करताना आपल्या पारंपरिक लोककलांचा वारसाही जपणे आवश्यक आहे. जुन्या कलापरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी संस्थानच्या समृद्ध लोककलेचा वारसा लाभलेल्या गंजिफा चित्रशैलीला नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या पारंपरिक कलेचे बारकावे शिकण्याची संधी मिळणार असल्याने कला क्षेत्रातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. यावेळी संस्थाध्यक्ष रमेश भाट, श्याम भाट, प्रकाश मसूरकर, गोविंद बांदेकर, अनुराधा परब, नकुल परसेकर, प्राचार्य उदय वेले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.