तालुकास्तरीय निपुण निबंध स्पर्धेत आनंद जाधव प्रथम.
देवगड.
निपुण भारत अभियान अंतर्गत स्तरावर निपुणोत्सव उपक्रम आयोजित केला होता.निपुणोत्सवात निपुण शैक्षणिक साहित्यनिर्मिती व तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या तालुकास्तरीय निपुण निबंध स्पर्धेत जि.प.पू.प्रा. शाळा जामसंडे कावलेवाडी प्रशालेचे आनंद जाधव (पदवीधर शिक्षक) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून सदर निबंध जिल्हास्तरासाठी पात्र ठरला आहे.माझी निपुण शाळा या विषयावर आधारीत सुमारे ६०० शब्द मर्यादित निबंध लिहला असून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अधिव्याख्याता, डाएट सिंधुदुर्ग डॉ.आयरेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.सजगाने यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
या निबंधस्पर्धेसाठी मार्गदर्शन जामसंडे हायस्कूलचे शिक्षक सुनिल जाधव यांनी केले. केंद्रप्रमुख देवगड राजेश पारकर, सचिन जाधव यांनी अभिनंदन केले.केंद्रबल गटातील शिक्षकांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.