बौद्धजन पंचायत समितीच्या विवाह मंडळातर्फे बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन......विवाहेच्छुक तरुण-तरुणींना भावी जीवनसाथी निवडण्याची सुवर्णसंधी

बौद्धजन पंचायत समितीच्या विवाह मंडळातर्फे बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन......विवाहेच्छुक तरुण-तरुणींना भावी जीवनसाथी निवडण्याची सुवर्णसंधी

मुंबई

 

      बौद्ध समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळा यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली ‘बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्या’चे रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जेरबाई वाडिया मार्ग, भोईवाडा, परळ, मुंबई-१२ येथे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बौद्धजन पंचायत समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत करणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसभापती विनोद मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तर सूत्रसंचालनाची धुरा सरचिटणीस राजेश घाडगे सांभाळतील तर विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे हे प्रास्ताविक करतील तर विवाह मंडळाचे चिटणीस गौतम जाधव हे आभार प्रदर्शन करतील.सदर मेळाव्यास उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे (कणगोलकर), एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घेत आपल्या भावी आयुष्याची सुंदर सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच नवीन प्रवेश घेणाऱ्या तरुण तरुणीने सभासद होण्यासाठी पासपोर्ट साईज व मोठा फोटो आणि सभासद फी हजार रुपये विवाह मंडळाकडे जमा करावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या विवाह मंडळातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.