प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार संलग्न करा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार संलग्न करा.  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांनी  30 स्टेंबरपर्यंत ईकेवायसी व बँक खाती आधार संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पंधारावा हप्ता आणि राज्य शासनाचा नमो योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी जिल्ह्यातील 14145 शेतकऱ्यांची ईकेवायसी आणि 16233 शेतकऱ्यांचे आधार सिडींग करणे प्रलंबित आहे. कृषी विभागाकडून हे कामकाज पूर्ण करण्यासाठी दि. 19 ते 30 सप्टेंबर पर्यंत मोहिम राबविली  आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क  ईकेवायसी व आधार सिडींग पूर्ण करुन घ्यावे. साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.  

प्रलंबित शेतकऱ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे –

देवगड, प्रलंबित ईकेवायसी संख्या-1072, प्रलंबित आधार सिंडींग संख्या-1920.

दोडामार्ग ,  प्रलंबित ईकेवायसी संख्या -1352, प्रलंबित आधार सिंडींग संख्या -1813.

कणकवली -, प्रलंबित ईकेवायसी संख्या-2275, प्रलंबित आधार सिंडींग संख्या- 2503.

कुडाळ- प्रलंबित ईकेवायसी संख्या- 3131,प्रलंबित आधार सिंडींग संखा-2977.

मालवण – प्रलंबित ई केवायसी संख्या-1766,प्रलंबित आधार सिंडींग संख्या-1899.

सावंतवाडी, प्रलंबित ईकेवायसी संख्या-2807, प्रलंबित आधार सिडींग संख्या-2906.

वैभवाडी, प्रलंबित ईकेवायसी संख्या-1124, प्रलंबित आधार सिडींग संख्या-1257.

वेंगुर्ला , प्रलंबित ईकेवायसी संख्या-618, प्रलंबित आधार सिडींग संख्या- 958.

एकूण प्रलंबित ईकेवायसी संख्या-14145, प्रलंबित आधार सिडींग संख्या-16233