लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात. देशात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी होत आहे निवडणूक.

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात.  देशात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी होत आहे निवडणूक.

नवीदिल्ली. 

   लोकसभेच्या सभापतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहेत. सभापती पदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला हे उभे राहिले आहेत तर विरोधकांकडून के सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सभापतीपदासाठी देशात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.
   सभापतीसाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने ही निवडणूक होत आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. तर इंडी आघाडीकडून के.सुरेश निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बुधवारी (२६ जून) पार पडणार आहे. देशात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहमतीने सभापती निवडले जात होते. मात्र यावेळी ही परंपरा खंडित होताना दिसत आहे.