सावंतवाडी येथे २७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन.
सावंतवाडी.
शहरामध्ये राज्यस्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवाचा आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव दि. २७ ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर नाथ पै इंदिरा गांधी संकुल येथे सकाळी ९ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचा शुभारंभ शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित असतील. याशिवाय खासदार विनायक राऊत व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, मुख्याधिकारी सागर साळुंखे यादी उपस्थित राहणार आहेत.या विज्ञान नाट्य महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी साडेपाच वाजता मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दीपक केसरकर मित्र मंडळ सावंतवाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.