रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकारांचे ऑनलाईन‌ पद्धतीने सर्वेक्षण.

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकारांचे ऑनलाईन‌ पद्धतीने सर्वेक्षण.

रत्नागिरी.

 रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफरसाठी फोटोग्राफर संघटनेमार्फत तसेच फोटोग्राफी इंडस्ट्रीमार्फत आयोजित केलेले विविध वर्कशॉप, कार्यक्रम, उपक्रम यांची जिल्ह्यातील फोटोग्राफर यांना माहिती मिळावी. 
शासन दरबारी रत्नागिरी जिल्ह्यातील फोटोग्राफरची ताकद दिसून यावी व त्याद्वारे शासनाचे विविध उपक्रम, सुविधा, शासकीय काम फोटोग्राफरसाठी उपलब्ध व्हावेत. सर्व फोटोग्राफर एकत्र यावेत संघटित व्हावेत.फोटोग्राफरला उद्भवलेल्या अडचणीत मदत उपलब्ध व्हावी. व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी. फोटोग्राफर बंधू प्रशिक्षित आणि प्रगत व्हावेत. या सर्वांसाठी प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफरचा गुगल  फॉर्मद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. हा फॉर्म व्यावसायिक फोटोग्राफी करणारे सर्व फोटोग्राफर भरू शकतात. जिल्ह्यातील एकूण फोटोग्राफरची संख्या कळणे. व त्यादृष्टीने फोटोग्राफरच्या व परिवाराच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हा हेतू या फॉर्म तयार करण्यामागे आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक फोटोग्राफर बंधूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा फॉर्म भरावा. तसेच व्यवसाय बंधूंनाही या लिंकची पोस्टची माहिती द्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.