पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शनिवारी बैठक

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक शनिवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.