केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत कार्यशाळेचे आयोजन. नवउद्योजक व बचत गटांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन.

सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनामध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले असे केंद्रीय मंत्री म्हणाले तसेच केरळमधील काथ्या उद्योग,आसाम मधील बांबू उद्योगांची प्रेरणा येथील उद्योजकांनी घ्यावी.जिल्ह्यातील दोन तृतीयांश पडीक जमिनीचा त्यासाठी वापर करावा व नवे उद्योग निर्माण करून सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा असे आवाहन देखील यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर खादी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कुमार, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण शुक्ला, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँके अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,डॉ.मिलिंद कुलकर्णी,नीता राणे, प्रज्ञा ढवण,गजानन गावडे, नॅसकॉम फाउंडेशनचे प्रमुख डॉ. चेतन सामंत उपस्थित होते.