वरिष्ठांशी बोलल्यानंतरच प्रचारात सहभागी होऊ. सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली नाराजी व्यक्त

वरिष्ठांशी बोलल्यानंतरच प्रचारात सहभागी होऊ. सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली नाराजी व्यक्त


सावंतवाडी 
       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची  बैठक सावंतवाडी येथे पक्ष कार्यालयात घेण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मिळालेल्या वाईट वागणुकीच्या अनुभवामुळे आलेल्या भावना सभेत व्यक्त करण्यात आल्या आमच्याबरोबर सन्मानाने वागा व महायुतीच्या उमेदवाराने दिलेला शब्द पाळावा एवढीच समस्त कार्यकर्त्यांची भावना असून त्या संदर्भात सावंतवाडी विधानसभा समन्वयक तथा प्रदेश चिटणीस सुरेश गवस,एम. के. गावडे यांनी जिल्हाध्यक्ष व वरिष्ठांशी बोलल्यानंतरच प्रचारात सहभागी होऊ असा निर्णय घेण्यात आला.
          यावेळी सावंतवाडी विधानसभा समन्वयक तथा प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस  एम. के.गावडे, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत , सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, सत्यजित देशमुख, शफिक खान, अस्लम खतीब, अशोक पवार, संदीप राणे, विजय कदम, रामचंद्र सावंत, रिद्धी परब, रंजना निर्मल, विलास पावसकर, दिपक देसाई, गुरुदत्त कामत, मेघेंद्र देसाई, प्रकाश गावडे, सतीश नाईक, सुशील चमणकर, गजानन कुंभार, चंद्रशेखर मांजरेकर, संतोष राऊळ, ऑगस्टीन फर्नांडिस, प्रमोद राऊळ, संतोष लवू राऊळ, रोहन परब, प्रमोद राऊत, धर्माजी गावडे, सचिन कोंडिये आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.