सिंधुदुर्गात आज पुन्हा रेड अलर्टचा इशारा

सिंधुदुर्गात आज पुन्हा रेड अलर्टचा इशारा

  

सिंधुदुर्ग

 

   सिंधुदुर्गात आज पुन्हा एकदा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. आजचा एकूण पाऊस २८८ मि.मी. असून, सरासरी ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर देवगड तालुक्यात ७० मि.मी. पाऊस कोसळला.जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये झालेला पाऊस (मि.मी. मध्ये) खालीलप्रमाणे

दोडामार्गः ११, सावंतवाडीः १६, वेंगुर्लाः १९, कुडाळः १६, मालवणः २९, कणकवलीः २५ इतकी नोंद करण्यात आली आहे.