देवरुख महाविद्यालयात विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार संपन्न.
देवरूख.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या हॉलीबॉल, बुद्धिबळ व तायक्वांदो खेळातील विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर यांनी केला. यावेळी उपप्राचार्य डॉ.सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिमखाना प्रमुख प्रा.सानिका भालेकर, क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार, प्रा.सीमा शेट्ये, प्रा.स्वप्नाली झेपले आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.सानिका भालेकर यांनी उपस्थिताना सद्भावना शपथ दिली. यानंतर प्रा.धनंजय दळवी यांनी विद्यार्थी खेळाडूंच्या यशाचा आढावा घेतला.प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सन्मानित केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे:-
हॉलीबॉल(मुले)- सूहेल हरचीरकर(कर्णधार), साईराज आंब्रे(उपकर्णधार), ऋषिकेश बागम, दीपेश कुळ्ये, पियुष गोताड, वेद लिंगायत, पियुष वेले, संस्कार वेलवणकर, सौरभ झेपले, हर्ष घाटकर, ऋतिक पाताडे आणि दुर्वेश चिमाणे.
बुद्धिबळ(मुले व मुली)-
चिराग पवार, वेद लिंगायत, साई हळदणकर आणि भाग्यलक्ष्मी मुळे.
तायक्वांदो- तनिष खांबे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक राहुल मांगले यांनी सहाय्य केले.