भाजपा दिव्यांग आघाडीचा समाजाभिमुख उपक्रम.....वजराठच्या दिव्यांग रमेश पेडणेकर यांना मिळाली ट्रायसायकल

भाजपा दिव्यांग आघाडीचा समाजाभिमुख उपक्रम.....वजराठच्या दिव्यांग रमेश पेडणेकर यांना मिळाली ट्रायसायकल

वेंगुर्ला 

 


     समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील वजराठ पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट देण्यात आली. दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रमेश पेडणेकर यांना आता स्वतःची कामे अधिक सहजतेने करता येणार असून इतरांवरील अवलंबित्वही कमी होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले की प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असून दिव्यांग बांधवांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्नशील राहील. दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांगांना केवळ मदत न करता त्यांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या सुविधा देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला. ट्रायसायकल स्वीकारताना रमेश पेडणेकर यांनी भाजपा दिव्यांग आघाडीचे आभार मानून या मदतीमुळे आपले जीवन सुलभ होईल अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास ता.चिटणीस नितीन चव्हाण, शक्तिकेंद्र प्रमुख नितीन परब, माजी सरपंच सूर्यकांत परब, जेष्ठ कार्यकर्ते वसंत परब, स्थानिक ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी, दिव्यांग आघाडीचे कार्यकर्ते आणि रमेश पेडणेकर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.