वेंगुर्ला परुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान शिबीर संपन्न

वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील परुळे गावात छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान शिबीर संपन्न झाले. यावेळी महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामकाज अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी म्हापण मंडळातील ग्रामपंचायत परुळे येथील सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दूधवडकर, सरपंच निलेश सामंत, उपसरपंच रुपेश मुंडये, मंडळ अधिकारी अजय कांबळी, ग्राम महसूल अधिकारी राहुल गवते, राजन जाधव, शरद शिंदे, सचिन देसाई, अभय परुळेकर, कृषी साहाय्यक सूरज परब, डॉ. उमाकांत सामंत, पोलीस पाटिल श्वेता चव्हाण, जान्हवी खडपकर, संदेश पवार, सौ. मुंड्ये, आर. आर. पिंगुळकर, एस. एस. वालावलकर, वैदेही पाटकर, स्नेहा कदम, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, मनोज दुधवडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये शेतकरी ग्रामस्थ यांच्याकरिता महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे दाखल्याचे वितरण, मोफत आरोग्य तपासणी तसेच कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा योजनांची माहिती, ॲग्रीस्टॅक नोंदणी इ. कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सर्व शेतकरी, विद्यार्थी व महिला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार महसूल मंडळ म्हापण यांनी मानले.