धाकोरे येथे रंगला 'खेळ पैठणीचा'

सावंतवाडी
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, धाकोरे आयोजित "रंग पैठणीचा - खेळ मनोरंजनाचा" कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये कराओके गीत, हास्य मिमिक्री, लावणी आणि पैठणीचा खेळ मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष अनंत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिमिक्री आर्टिस्ट, व्हॉइस ओवर आर्टिस्ट अँकर श्री. राहुल कदम यांनी केले.यामध्ये प्रथम क्रमांक प्रितम प्रदीप गोवेकर यांनी पटकावला. त्यांना नवरात्रौत्सव मंडळ धाकोरे यांच्याकडून मानाची पैठणी देण्यात आली.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
- द्वितीय क्रमांक विजेत्या (किचन सेट)- पूर्वा चेतन गवस (पुरस्कृत - सदानंद रामा गवस व विठाई रामचंद्र गवस)
- तृतीय क्रमांक विजेत्या (किचन सेट) - वैष्णवी उमेश गोवेकर (पुरस्कृत - लोकमान्य मल्टीपर्पज को-आप. सोसायटी लि शिरोडा)
- उत्तेजनार्थ- अक्षरा अनिल नाईक, शुभदा कृष्णा गोवेकर, अदिती अजित परब
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत नाईक, उपाध्यक्ष श्री. बबन मुळीक, मा. पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर, पोलीस पाटील श्रीराम राळकर, उपसरपंच सोनू गवस, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, संजय घुबे, उमेश गोवेकर, प्रल्हाद मुळीक, बाबी राळकर, अविनाश राळकर, हरेश कोठावळे, गोविंद साटेलकर, दीपक दाभोलकर आदी उपस्थित होते.