परुळे नं.३ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

परुळे नं.३ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

वेंगुर्ला.

    तालुक्यातील परुळे शाळा नं.३ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग दिनानिमित्त योग शिक्षिक डॉ.प्रशांत साळगावकर यांनी योगाचे विविध प्रकार, आसनांचे प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून करून घेतले.
   यावेळी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व सांगताना आपला शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास करण्याचे सामर्थ्य योगात असूननेहमी सकाळचा एक तास प्रत्येकाने स्वतःसाठी देण्याचे आवाहनविद्यार्थ्यांना केले लोकमान्य सोसायटी परुळे शाखा व जिल्हापरिषद शाळा नंबर ३ यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.शुभेच्छा देताना सर्वांनी योग साधना करणे काळाची गरज आहे असे सांगितले.
   यावेळी लोकमान्य शाखा व्यवस्थापक गौरी सामंत यांचे शाळेच्या वतीने स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
  या कार्यक्रमाला नीलिमा कदम मुख्याध्यापक, प्रविना  दाभोलकर, चिंतामणी सामंत, साहिल माड्ये, अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर. शिक्षक शालीक पाटिल यांसह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.