अजित पवारांच्या घातपातात 'या' नेत्याचा हात आहे का?.....रामदास कदमांनी थेट नाव घेतले
मुंबई
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर त्यांच्या मृत्यूविषयी रोहित पवार यांनी सातत्याने घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती.त्यातच आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना तटकरे यांच्यावर घणाघात केला. "तटकरे अंतुले यांचा पीए होता. अंतुलेंना तटकरे यांनीच संपवले. जो जो माणूस याला जवळ घेतो त्यांना संपवण्याचं काम ते करतात. सुनील तटकरे यांना दुसरं उपमुख्यमंत्री व्हायचं होतं असं मी ऐकलं आहे. मग अजितदादांच्या घातपातात तटकरे यांचा हात आहे की काय? असा संशय निर्माण होतो. या प्रकरणाची या अँगलने चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे. ते काहीही करू शकतात," असा आरोप कदम यांनी केला.कदम यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
konkansamwad 
