मालवण येथे २ ते ५ मे कालावधीत चित्रप्रदर्शनाचे आयोजन.

मालवण.
गोडकर्स आर्ट ॲकॅडमीतर्फे मालवण येथील दैवज्ञ भवन येथे दि. २ ते ५ मे या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मालवण शहरातील शाळांतून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धातील विजेत्यांची चित्रे मांडण्यात येणार आहेत.
गोडकर्स आर्ट ॲकॅडमी तर्फे मालवण शहरात शालेय व खुल्या गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५६० चित्र प्रवेशिका आल्या होत्या.प्रत्येक गटास १५ अशी एकूण ६० बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा निःशुल्क होती. प्रत्येक गटातील सर्व स्पर्धकांना सहभाग सर्टिफिकेट दिले गेले आहे. गोडकर्स अॅकॅडमीच्या चित्रप्रदर्शनासोबत विजेत्या स्पर्धकांचे व निवडक २५० चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आजवर गोडकर्स आर्ट ॲकॅडमीच्या माध्यमातून ४०-४५ वर्षे सतत हा प्रयत्न केला जात आहे.