विनयभंग प्रकरणी दोषीची जामीनावर मुक्तता.......ॲड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद

कुडाळ
महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी गणेश कोरगावकर याची जिल्हाप्रधान व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जामीनावर मुक्तता केली.
सविस्तर वृत्त असे की साळगाव येथील एका महिलेने दि. 22 /04/2025 रोजी आरोपी दुपारी सव्वा तीन वाजता घराच्या पाठीमागून घरात घुसून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. या कृत्याच्या विरुद्ध सदर फिर्यादीने कुडाळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. आरोपीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम(332 c)आणि (75 1 i) अन्वये गुन्हा दाखल केला होता.या अनुषंगाने आरोपीस पोलिसांनी दि. 23/04/2025 रोजी अटक करुन मेहरबान न्यायालयात हजर केले व न्यायालयीन कोठडीची मागणी केली.तशी न्यायालयीन कोठडी मंजूर करून मेहेरबान न्यायालय यांनी दिनांक 7 मे 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी विरुध्द कुडाळ न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. म्हणजेच 24 तासाच्या आत गुन्हा घडल्या नंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल केले.त्यानंतर या गुन्ह्याच्या अनुषंगाने व सदर गुन्हा हा सेशन ट्रायबल असल्या कारणाने त्या गुन्हाच्या कामी आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दिनांक- 24/ 4 /2025 रोजी दाखल केला व त्यांची सुनावणी दिनांक 25/4/2025 रोजी झाली. मे. न्यायलया समोर झालेला युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राह्य मानून व दाखल असलेल्या दोषारोप पत्राचा विचार करुन आरोपीची योग्य त्या अटी-शर्टीवर व 50 हजार रुपये रक्कमेच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली.आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे व ॲड. वृषांक जाधव यांनी काम पाहिले.