कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान. रत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार ६८१ मतदार; ३८ मतदान केंद्र.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान.   रत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार ६८१ मतदार; ३८ मतदान केंद्र.

रत्नागिरी.

   महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी उद्या बुधवारी २६ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
   जिल्ह्यामध्ये एकूण 22 हजार 681 मतदार संख्या आहे. तालुकानिहाय अनुक्रमे मतदान केंद्र आणि मतदार संख्या पुढीलप्रमाणे मंडणगड -1 व 645, दापोली 4 व 2037, खेड 4 व 2168, चिपळूण 8 व 4241, गुहागर 2 व 1652, संगमेश्वर 5 व 2549, रत्नागिरी 9 व 6085, लांजा 2 व 1610 आणि राजापूर 3 व 1694. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, असे मतदार ओळख पटवण्यासाठी पुढील कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतील. आधार कार्ड, ड्राव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र, राज्य, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक समिती अथवा खासगी आस्थापनांनी नोकरदारांना दिलेले ओळखपत्र, संसदेने तसेच विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र, शालेय संस्थेने दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाने दिलेले पदवी/पदविका प्रमाणपत्राची खरी प्रत, दिव्यांग ओळखपत्र.
         
निवडणुकीसाठी मत नोंदविण्याबाबत महत्वाच्या सूचना-

   मतदानाची कार्यपध्दती मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरू नयेत. पसंतीक्रम" (Order of Preference) या स्तंभामध्ये, ज्यास पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोर '1' हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. '1' हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल. निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील.  उदा. जर 5 उमेदवार निवडणूक लढवित असतील आणि फक्त । उमेदवार निवडून द्यावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे 1 ते 5 पसंतीक्रम देऊ शकता.
   कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद केला जाईल याची खात्री करावी आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसेल.  "पसंतीक्रम" (Order of Preference) स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III, इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील १, २, ३ किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व पदवीधर मतदारांनी न चुकता मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.