आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अणसूर पाल हायस्कूल येथे प्राणायाम प्रात्यक्षिके.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अणसूर पाल हायस्कूल येथे प्राणायाम प्रात्यक्षिके.

वेंगुर्ला.

  आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर गावातील अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी योग प्राणायाम प्रात्यक्षिके करून योग दिन उत्साहात  साजरा केला यावेळी योग प्राणायाम यांचे भारतीय संस्कृतीतील व सध्याचे ताणतणाव धावपळीच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी असणारे महत्त्व मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी विशद केले.
   यावेळी शिक्षक विजय ठाकर, अक्षता पेडणेकर, चारुता परब आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.