केळकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.सुनेत्रा ढेरे यांचा दक्षिण कोरियामध्ये जागतिक चर्चा सत्रामध्ये शोधनिबंध सादर.
देवगड.
येथील महाविद्यालयातील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी दक्षिण कोरियामधील जेजु आयलंड येथे दि. ८ ते ११ जून 2024 दरम्यान पार पडलेल्या पदार्थ विज्ञानावरील जागतिक परिषद (GCIM 2024) येथे शोधनिबंध सादर केला. डॉ. सुनेत्रा यांच्या 'सौरऊर्जा आणि रासायनिक रंग आणि प्रतिजैविकाचे विघटन करण्यासाठी कॉपर सल्फेट नॅनो पार्टीकल्स उपयोग' यावर आधारित शोधनिबंधाची निवड सदर परिषदेसाठी झाली होती. हे संशोधन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. ही संशोधन परिषद Materials Research Society of Korea यांनी आयोजित केली होती. पदार्थविज्ञान क्षेत्रातील अनेक शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांनी या परिषदेमध्ये आपल्या क्षेत्रातील संशोधनपर नवीन माहितीचे आदन प्रदान केले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेचे पदाधिकारी, तसेच देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापिका डॉ. सुनेत्रा ढेरे यांचे अभिनंदन केले.