सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग

 

 

सावंतवाडी


 

     सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग लागली. बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. देऊळवाडी आणि घोगळवाडी येथील तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसले. आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुण तात्काळ सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर धावले. त्यांनी बँकेचा लाकडी दरवाजा तोडून आग विझवण्यासाठी लगबगीने आत प्रवेश केला. आगीचा वणवा मोठा होता. आग आटोक्यात आणण्यासाठी सेंट्रल बँकेच्या लगत घर असलेल्या दादा घाडी यांच्या मोटरपंपाचा वापर करून पाणी मारण्यात आले. तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे तासाभरातच आग नियंत्रणात आली. अन्यथा, सेंट्रल बँकेच्या तळमजल्यावर फर्निचरचे कार्यालय आणि बाजूला एटीएम मशीन असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. आग लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, चंद्रशेखर प्रभू, अक्षय पेडणेकर, जयेश तुळसकर, नितीन मांजरेकर, यतीन घाडी, सोनेश सातार्डेकर, संदेश सातार्डेकर, आत्माराम घाडी आणि प्रथमेश पेडणेकर यांनी पुढे सरसावत आग विझवण्यासाठी मदत केली.