आमदार नितेश राणे ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

आमदार नितेश राणे ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

कणकवली.

  कणकवली- देवगड-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे मंगळवार ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित राहणार आहेत.