एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या १८ विद्यार्थ्यांची किरण अकॅडेमी पुणे या सॉफ्टवेअर ट्रेनिंग कंपनीमध्ये इन्क्यूबेशन प्लेसमेंट साठी निवड.

सिंधुदुर्ग.
एस एस पी एम कॉलेज आँफ इंजिनिअरींग च्या कॉम्प्युटर विभागातील १० आणि ए आय एम एल (AIML) विभागातील ८ अशा एकूण १८ विदयार्थ्यांची किरण अकॅडेमी (Kiran Academy) या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इन्क्यूबेशन प्लेसमेंट साठी निवड झाली आहे.
कॉम्प्युटर विभागातून लविना परुळेकर, तन्वी शिरसाट, स्मिता कदम, असीम फरास, आकाश राठोड, आकांक्षा पाटील, शुभम पाटील, वनिता वराडकर, दुर्वांक सुतार, मिशल रैस आणि ए आय एम एल (AIML) विभागातून साक्षी शेट्ये, डेंझिल डांटस, संजना नाईक, प्रणव मोदी, बालाजी चव्हाण, प्रज्वल पाटील, वरद नाईक आणि शुभदा ताम्हाणेकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण जून २०२४ मध्ये पूर्ण होणार असुन त्यापुर्वीच त्यांची इन्क्यूबेशन प्लेसमेंटसाठी निवड झाली आहे. सदरच्या निवड प्रक्रियेसाठी किरण अकॅडेमी कंपनी चे टेक्निकल लीड नवम तिवसकर यांनी मंगळवार दि ३१ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. त्यामध्ये ऍप्टीट्युड व ग्रुप डिस्कशन पद्धतीने घेण्यात आलेल्या टेस्ट मधून तसेच मुलाखती मधून सदरच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही प्रक्रिया अतिशय कठीण समजली जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामिंग स्किल, बौद्धिक क्षमता व शिकत असलेल्या विषयांचे आकलन या सर्व पात्रता फेरींमधुन गेल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी निवड होते. एस एस पी एम च्या विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाची आवड आणि त्यांना मिळणारे मार्गदर्शन यामुळेच त्यांची सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड होऊ शकते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांच्या प्रयत्नांना संस्थेचे ही तितकेच पाठबळ मिळत आहे.