आनंदवाडी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला आनंदवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी ११ वा. समाज मंदिर आनंदवाडी वेंगुर्ला येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.यांनतर त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी आयु वाय.जी.कदम यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नसून ते सर्व समाजाचे हाते.त्यांनी सर्व समाज घटकांना एकत्र करून समान न्याय दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा मूळ गाभा बदलून चुकीच्या पद्धतीने राज्य घटनेचा वापर केला जात आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना व घटना माननाऱ्या जनतेला धोक्याचा इशारा आहे. त्यामूळे या धोक्यापासून सावध राहून आपण घटनेचे संरक्षण केले पाहिजे, हिच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले.यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण जाधव व सचिव अमोल जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी बौद्ध उपासक गौतम जाधव, गजानन जाधव, वामन कांबळे, सुभाष जाधव, आर.के.जाधव, सुरेश जाधव, प्रणील जाधव, संदीप जाधव, सखाराम जाधव, राजन जाधव, संतोष जाधव, हर्षल जाधव, प्रविण जाधव, उद्धव जाधव, शुभम जाधव, श्रेयश जाधव, प्रज्वल जाधव, प्राविण्य जाधव, प्रज्योत कदम, तेजस जाधव, सावित्रीबाई फुले महिला मंडळ माजी अध्यक्ष सरोजनी जाधव व सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले तर आभार किरण जाधव यांनी मानाले.सायंकाळी ७.०० वा आनंदवाडी ते शिरोडा नाका - दाभोली नाका - बाजारपेठ ते आनंदवाडी अशी अभिवादन फेरी काढण्यात आली.यावेळी अभिवादन फेरी मध्ये मोठ्या संख्येने धम्म बांधव-भगिनी सहभागी झाले होते.