शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान.

शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान.

वेंगुर्ला.

   तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी (आजु) अमरे  व कासव मित्र, सामाजिक  कार्यकर्ते आबा चिपकर यांनी या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी वाळुच्या खड्यात पुरुन त्यांचे संरक्षण केले.व गेले अनेक वर्षे हे कार्य करित आहे. 
    पंचेचाळीस दिवसांपुर्वी आजु अमरे व कासव मित्र श्री राजाराम उर्फ आबा चीपकर यांनी सुरक्षित केलेल्या १२० अंड्यांमधून १०८ पिल्ले सुरक्षित पाण्यात सोडण्यात आली. सोडत असताना यावेळी आजु अमरे, आबा चिपकर, गौरीज अमरे, मदन अमरे, पास्कोल फर्नांडिस, आनंद अमरे, दीपा अमरे, संतोष भगत, भुषण मांजरेकर, कोमल भगत, शोजल भगत, प्रज्वल भगत, छकुली भगत, स्वपनेश भगत, सलोनी भगत, साची भगत व विदेशी पर्यटक उपस्थित होते. यावेळी पर्यटकांनी मनपुर्वक आनंद लुटला.