अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी व भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला च्या वतीने आयोजित भीम गीतांच्या समूह गायन स्पर्धेत आसोली प्रज्ञासूर्य संघ प्रथम.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी व भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला च्या वतीने आयोजित भीम गीतांच्या समूह गायन स्पर्धेत आसोली प्रज्ञासूर्य संघ प्रथम.

वेंगुर्ला.

    अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ला व भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामान आयोजित 'होता तो भीम माझा' भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत आसोली प्रज्ञासूर्य ग्रुप प्रथम, मालवण फुले-शाहू- आंबेडकर विचारमंच द्वितीय, आडेली उत्कर्षा महिला मंडळ तृतीय तर रमाई कलाविष्कार ग्रुप मडुरा व भीमनगर सरमळे ग्रुपने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
   या स्पर्धेचे उद्घाटन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे महासचिव किशोर कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सामाजिक कार्यकर्ते नितीन मांजरेकर, इंजिनिअर अनिल जाधव, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच वेंगुर्लाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, समर्पण फाऊंडेशन सिधुदुर्ग अध्यक्ष सुहास कोळसुलकर, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सिंधुदुर्गचे सरचिटणीस राजेश कदम, अपरान्तचे कणकवली तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.वसंत नंदगिरीकर, भारतीय बौद्ध महासभेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, सचिव रामचंद्र जाधव, अपरान्तचे सरचिटणीस लाडू जाधव, चिटणीस कर्पूरगौर जाधव, खजिनदार सुंदर म्हापणकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ल्याचे हिशोब तपासणीस अशोक सावळे, लाडू जाधव, रामचंद्र जाधव, मधुकर मातोंडकर, सगुण मातोंडकर, चंद्रकांत म्हापणकर, सुंदर म्हापणकर, जयप्रकाश चमणकर, सुनिल जाधव, स्वप्निल होडावडेकर आदी उपस्थित होते.
    स्पर्धेचे परिक्षण म्हापण येथील भाई साटेलकर व तुळसमधील श्रद्धा नाईक-तांडेल यांनी तर सूत्रसंचालन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले.