जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर.

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर.

मुंबई.

    या वर्षीच्या लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ठरले आहेत.संगीत सेवेसाठी संगीतकार ए. आर. रहमान, नाट्य- सिनेसृष्टीतील सेवेसाठी अशोक सराफ, सिनेसृष्टीतील सेवेसाठी पद्मिनी कोल्हापुरे, पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर, नाट्यसेवेसाठी अतुल परचुरे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुड्डा यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहेत.मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. याअंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.२०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता तर दुस-या वर्षी हा मान आशा भोसले यांना मिळाला होता.हे पुरस्कार येत्या २४ एप्रिल रोजी दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे प्रदान करण्यात येतील.