पाट येथील आकांक्षा कुंभारला ‘हिडन गेम्स अवॉर्ड’ प्रदान.
वेंगुर्ला.
शालेय शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कला कौशल्याना वाव मिळावा या हेतूने राधारंग फाउंडेशनकडून यावर्षीपासून हिडन गेम्स अवॉर्ड देण्यात येत आहे. यावर्षीचा पहिला हिडन गेम्स अवॉर्ड पाट येथील कु.आकांक्षा दीपक कुंभार हिला प्रदान करण्यात आला.
आकांक्षा ही पाट येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारी मुलगी असून तिचे वडील मोलमजुरी करतात आई घरीच असते.तिचे वडील खेळाडू असल्याने ती वडिलांसह नियमित सराव करते. तिने अनेक वेळा विभाग स्तरापर्यंत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे.काही दिवसापूर्वी ती गुजरात येथे झालेल्या स्पर्धामध्येही सहभागी झाली होती.पुढील आठवड्यात ती चिपळूण येथे होणाऱ्या खेलो इंडिया मध्ये सहभागी होणार आहे.धावणे व लांबउडी या प्रकारात तिला प्रावीण्य मिळवायचे आहे. योग्य प्रशिक्षकाचा अभाव आणि आवश्यक आहार ही तिची प्रमुख समस्या आहे.प्रशिक्षकाची फी परवडत नाही.तसेच स्पर्धेत सहभागी होताना प्रवासखर्च ही परवडत नाही.पण खेळण्याची जिद्द आहे.
राधारंगचे डॉ.अशोक सरनाईक व रघुनाथ सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जात आहे. तिला दिलेल्या रकमेतून तिच्या मधील कौशल्य गुणांना अधिक वाव मिळावा आणि त्यातून सुंदर धावपटू तयार व्हावी, यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार माड्याच्यावाडी हायस्कूल च्या कै.गुरुनाथ सरनाईक सभागृहात राधारंग फाउंडेशन च्या कार्यकारिणी मंडळाच्या हस्ते देण्यात आला.