भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

कुडाळ.

   सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी शांतादुर्गा हॉल,पावशी ता.कुडाळ येथे संपन्न झाली.यावेळी नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
   या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण विभाग संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा निवडणुक प्रमुख व माजी आमदार राजन तेली, महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व इतर मान्यवर नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
  या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/प्रकोष्ट/ आघाडी/ जिल्हाध्यक्ष/संयोजक, मंडल अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते .
  बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केले.