नरेंद्र उद्यान येथील मोफत वनसफरीची घोषणा होऊनही शुल्क आकारणी. शिक्षण मंत्री केसरकरांनी फसव्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करू नये; सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदाराची जोरदार टीका.
सावंतवाडी.
सावंतवाडी नरेंद्र उद्यान येथे सुरु करण्यात आलेली वन सफर 31 मार्च पर्यत मोफत ठेवण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री यांनी करून देखील या वन सफारीसाठी शुल्क आकारले जातं असल्याने ना. केसरकर यांनी ऐन आचारसंहितेच्या काळात फसव्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करू नये अशी टीका सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक यांनी केली आहे.
सावंतवाडी नरेंद्र वन उद्यान येथे वनविभागाने नुकताच वन सफर हा जगंल सफारीवर आधारित उपक्रम सुरु केला आहे. शालेय शिक्षण मंत्री ना दीपक केसरकर यांनी सिंधूरत्न योजनेमधून वन सफारीसाठी वाहन ही उपलब्ध करून दिले आहे.या वाहनातून संपूर्ण नरेंद्र उद्यानाची जगंल सफर नागरिकांना घडवून आणली जाणार आहे.या वनसफर पर्यटन प्रकल्पाचें उदघाट्न चार दिवसापूर्वीच ना.केसरकर यांच्या हस्ते झाले होते.यावेळी त्यांनी ही सफर सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी 31 मार्च पर्यंत पूर्णपणे मोफत असणार आहे त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी घोषणा केली होती. त्यानंतर वन विभागांकडे वनसफर घडवून आणण्यासाठी नागरिकांची मागणी वाढत आहे परंतु या सफरीसाठी ठराविक शुल्क आकारले जातं आहे याबाबत नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांच्याकडे तक्रारी केल्या असून लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर चार दिवसापूर्वीच ही घोषणा ना केसरकर यांनी केली होती त्यां घोषणेचें काय झाले याची आठवण सुभेदार यांनी करून देत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उठसुठ घोषणा केसरकर यांच्याकडून केल्या जातं आहेत त्यां त्यांनी थांबवाव्यात अशी मागणी सुभेदार यांनी करतं वनसफारी साठी वनविभागाकडून शुल्क आकारले जात आहे मुळात केसरकर यांनी ही सफर मार्च महिना संपेपर्यत मोफत असणार आहे याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले होते. परंतु नागरिकांना ही सुविधा विनाशुल्क दिली जात नाही असा कित्येक नागरिकांना अनुभव आला आहे त्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले. सावंतवाडी पर्यटन महोत्सव होणार असल्याची घोषणा देखील केसरकर यांनी केली होती मात्र लागलेली आचारसहीता चार जूनला संपणार त्यामुळे पर्यटन महोत्सव पावसात होणार का? असा सवाल केला असून उठसुठ कोणत्याही घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करू नका असे आवाहन देखील आशिष सुभेदार यांनी केले आहे.