सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस - ठाकरे शिवसेनेची अभेद्य आघाडी. ओरोस येथे काँग्रेस व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

सिंधुदुर्ग.
जिल्ह्यात काँग्रेस-ठाकरे शिवसेनेची अभेद्य आघाडी असून आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी काँग्रेस व ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची ओरोस येथे आज एकत्रित बैठक झाली.
काँग्रेस व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केली होती. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी, देशात इंडिया आघाडी भक्कम स्वरुपात उभी राहिली असून जिल्ह्यातही ही आघाडी यापुढील काळात एकसंधपणे काम करले, असे सांगून आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या महाविकास आघाडी म्हणून लढल्या जातील व सर्व घटक पक्षांचा मानसन्मान ठेवला जाईल.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार वैभव नाईक, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी अॅड.दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर, वेंगुर्ला काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत, सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, सचिव रवींद्र म्हापसेकर, सुंदरवल्ली स्वामी इत्यादींनी भाग घेतला.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडीया आघाडीचा उमेदवार प्रचंड मतानी निवडून येणासाठी सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सतिश सावंत, संग्राम प्रभूगावकर, अॅड.राघवेंद्र नार्वेकर, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर,उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, सुरज घाडी, केतनकुमार गावडे, संतोष मुंज, पांडुरंग खोचरे, पालव, बापू नाईक इत्यादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.