डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव शारदा विद्यालयाचे उल्लेखनीय यश.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव शारदा विद्यालयाचे उल्लेखनीय यश.

सावंतवाडी.

    मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव जिल्हा परिषद शाळेने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून शाळेचा परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला. यात दशरथ पंढरीनाथ गावकर याने २५४ गुण मिळवून सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत सहावा व गणित व मराठी विषयात प्रथम आला आहे.
   या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, गौरी डिचोलकर यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.