पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट.

वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या परिक्षणासाठी आल्यानंतर पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट दिली याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, मराठी लेखक आनंद म्हसवेकर व कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर उपस्थित होते. कोकणी संस्कृती, विविध सण व उत्सव, वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक व पर्यटन स्थळे यांच्या हुबेहुब प्रतिकृतींसह माहिती दर्शवणारे वैशिष्टयपूर्ण असे कलादालन अद्वितीय असल्याचे गौरवोद्गार नयना आपटे यांनी काढले व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.