सावंतवाडीत वीज समस्यांबाबत सर्वपक्षिय नेतेमंडळींनी, ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

सावंतवाडीत वीज समस्यांबाबत सर्वपक्षिय नेतेमंडळींनी, ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

सावंतवाडी.
  
    महावितरण च्या अंधाधुंदी कारभारबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत.विजपुरवठा वारंवार खंडित होत आहे, पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे. यासंदर्भात आज सर्व सावंतवाडीतील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेते एकत्र येत सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे धडक देत संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्याना धारेवर धरले.यानंतर हॉटेल मँगो येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या वीजेच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी, ग्राहक, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
  यावेळी माजी आमदार राजन तेली, युवा उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, पुंडलिक दळवी, अजय गोंदावळे, राजू बेग, ॲड.अनिल केसरकर, एकनाथ नाडकर्णी शेखर गांवकर, सरपंच सौं सावित्री पालेकर, तारकेश सावंत, गुणाजी गावडे, गोविंद सावंत, विनोद सावंत, आनंद नेवगी, तसेच दोडामार्ग वेंगुर्ला, तालुक्यातील ग्राहक राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.