सांगली येथील अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मिळणार मोफत सेवा. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे केले आवाहन.

सांगली येथील अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मिळणार मोफत सेवा.  सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे केले आवाहन.
सांगली येथील अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मिळणार मोफत सेवा.  सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे केले आवाहन.

सिंधुदुर्ग.

   सांगली येथे नव्याने 350 बेडचे उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक व डॉक्टर यांची सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची भेट घेतली आहे.

योजना आणि कोणत्या आजारांवर होणार उपचार -

    नव्याने सांगली येथे अद्यावत तीनशे पन्नास बेडचे उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल धामणी रोड सांगली येथे झाले असून या रुग्णालयामध्ये झिरो ते अठरा वयोगटातील मोफत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजने अंतर्गत सुरू करणारे उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे सांगली जिल्ह्यातील पहिले मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल झाले असून, झिरो ते अठरा वयोगटातील 104 प्रकारच्या जन्मजात व्यंग आणि आजारांवर परिपूर्ण उपचार फाटलेले ओठ, किंवा टाळू, मेंदू आणि मणक्यातील जन्मजात दोष जन्मजात पायातील दोष हृदयरोग हृदयाला छिद्र असणे फुफ्फुसाला होणाऱ्या रक्तपुरवठातील दोष हृदयाच्या झडपामध्ये बिघाड हृदयाच्या धमण्या मधील काठिण्य प्लास्टिक सर्जरी हाडाच्या शस्त्रक्रिया मेंदूचा आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया कान, नाक, घशाच्या शस्त्रक्रिया कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया हनिया ऑर्किओपेक्सी स्प्लेनेक्टोमी पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया अशा सर्व १०४ प्रकारच्या जनरल सर्जरी सर्व प्रकारची शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर आहेत.
   यासाठी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड जन्म दाखला शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट शासकीय जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयात आजारासंबंधात व शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात रेफरल लेटर या योजनेअंतर्गतचा मोफत लाभ घेण्यासाठी हे आवश्यक असून या रुग्णालयामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण झिरो ते अठरा वयोगटातील रुग्णांना मिळणार असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रातील रुग्णांनी याचा मोफत लाभ घ्यावा अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे.