धामापूर येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

धामापूर येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

मालवण.

    राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशाखा धामापूर च्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉ. आंबेडकर नगर येथे साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी बुद्ध पूजा, बुद्ध वंदना,सुत्रपठण, प्रतिमापूजन झाले नंतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.संदेश धामापूरकर यांनी प्रास्ताविक करत या दिवसाचं महत्व सांगताना ते बोलत होते की शांती,अहिंसा,प्रेम,दया ही मूलभूत तत्वे असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. असे सांगत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी गावशाखा अध्यक्ष सुजय कदम,सचिव संदेश धामापूरकर,ग्रा.पं.सदस्य स्वप्नील नाईक, संजय जाधव,वृषाली नाईक,माजी ग्रा.पं.सदस्य सूर्यकांत नाईक,सोनम कदम,सचिन कोळंबकर, सुमन धामापूरकर,सानिया जाधव,कु. करुणा धामापूरकर, विशाखा नाईक व गावशाखेचे सभासद तसेच धम्म बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.