प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.

सिंधुदुर्ग.

    ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ग्रामीण भागात 500 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' (PM-GKVK) निर्माण करण्यात येणार आहेत. याअंतर्गत जिल्हयात 8 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९  रोजी सायंकाळी ०४:०० वाजता दूरदृष्यप्रणालीव्दारे (ऑनलाईन) होणार आहे.
   जिल्हयात ग्रामपंचायत शिरगांव, साठेली भेडशी, पिंगुळी, आचरा, शिरोडा, कोकीसरे, माजगांव, या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन ग.पां.चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिधुदुर्ग यांनी केले आहे.