विशाल परब यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश.

विशाल परब यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश.


वेंगुर्ला 
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ विशाल परब यांचा वेंगुर्ला तालुका दौरा आज पार पडला. सकाळी दहा वाजता श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच कुंभार समाजातर्फे कुंभार टेम तुळस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर म्हाडा कॉलनी वेंगुर्ला येथे श्री नारायणराव राणे यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायत उपसरपंच सुषमा गोडकर यांनी कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये प्रवेश केला. तर भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सागर राणे, संकेत धुरी व सोमेश बागकर यांच्या प्रयत्नातून वरची केरवाडा यंग बॉईज ग्रुप च्या सत्यनारायण मोणकर सहित ३० युवकांनी, सागरतीर्थ बागकरवाडी येथील रुपेश बागकर, गौरव बागकर, प्रशांत बागकर यांच्या सहित २५ युवकांनी, सागरतीर्थ वेळाकर येथील मोतेश फर्नांडीस, बनारत फर्नांडिस, रॉकी फर्नांडिस, विकी मेंडीस यांच्यासाहित २५ ते ३० युवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला
    तसेच जय मानसिश्वर वेंगुर्लाचे सॅमसन फर्नांडिस, ओंकार रेडकर यांच्यासाहित २० जणांनी, म्हाडा कॉलनी येथील सुहास परब, हर्ष कोचरेकर, अक्षय परब, गणेश जगताप, सदाशिव केरकर, मयूर पवार, केवल केरकर, सागर वेंगुर्लेकर, सुरज पालव, नयन गावडे, गुरुदास केरकर, यतीश पेडणेकर, जयेश राऊळ, तन्मय सातरडेकर, गिरीष जगताप आणि अक्षय मिसाळ यांच्यासाहित २० जणांनी भाजप मध्ये प्रवेश केला. 
          यावेळी विशाल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला विशाल परब की आज एक मे महाराष्ट्र दिन आणि श्रमिक दिनी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी व नारायणराव राणे, रवींद्र चव्हाण या सर्वांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश झाला. नारायण राणे यांनी जेव्हा रत्नागिरी मध्ये फॉर्म भरला तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे हा उत्साह पुढील सात-आठ दिवस तसाच राहील. ७ मे ला राणे साहेबांना अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने आमचे सगळे कार्यकर्ते निवडून आणतील अशी आम्हाला आशा आहे. वेंगुर्ला मधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि तळागाळातील जनता ही भारतीय जनता पक्षासाठी खूप चांगला पोषक वातावरण आहे. मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य विकास कामे झालेली आहेत आणि होत आहेत. तसेच त्यांनी जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई तालुकाप्रमुख सुहास गवांडळकर ॲड. निरवडेकर साहेब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , युवा मोर्चा प्रदेश निरीक्षक सर्वांनी चांगले सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानले. तसेच वेंगुर्ला मध्ये 90% भारतीय जनता पक्षाला वोटिंग होईल अशी मी आशा बाळगतो असेही ते म्हणाले.
   यावेळी या सर्व युवकांचे विशाल परब यांनी भाजप मध्ये स्वागत करून पुढे त्यांच्या भागात दौरा आयोजित करून अधिक संघटना बळकट करण्यासाठी आश्वासन दिले. यावेळी ऍड निरवडेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, विजय रेडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, प्रसाद पाटकर, पुंडलिक हळदणकर, हेमंत गावडे, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, राहुल गावडे, सागर राणे, मनोहर तांडेल, नारायण कुंभार, प्रसाद नाईक, अमेय धुरी, रवींद्र धोंड, सोमकांत सावंत, संतोष सावंत, प्रशांत बोवलेकर, बंटी गावडे, गौरेश खानोलकर, जया राऊळ, भुवनेश परब, कौस्तुभ वायंगणकर, अक्षय परब आदी उपस्थित होते.